म्हणून विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंनी घेतली माघार…

रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आपण माघार का घेत आहोत हे सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील आताच्या घडीची मोठी बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते 13- 14 जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणार नाही, असं जरांगे म्हणालेत.

 

मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) केली आहे. आपले अर्ज, मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) जाहीर केली आहे.

 

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या. ” असंही आवाहन मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) म्हटलं आहे.

maharashtra assembly elections 2024manoj jarange patilmanoj jarange patil assembly election 2024vidhansabha election 2024
Comments (0)
Add Comment