कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी विशेष गाड्या

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या गर्दीला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने आदिलाबाद ते पंढरपूर आणि नांदेड ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या चलविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे —

1. गाडी क्रमांक 07501 आदिलाबाद ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी :
गाडी संख्या 07510 ही विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 11 नोव्हेंबर ला दुपारी 14.00 वाजता सुटेल आणि किनवट, बोधडी, धानोरा, सहसरकुंड, हिमायत नगर, हदगाव रोड, भोकर, मुदखेड, हुजूर साहिब नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टोवून, कुरडूवाडी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी 07.30 वाजता पोहोचेल.

 

2. गाडी क्रमांक 07531 पंढरपूर-नांदेड अनारक्षित विशेष गाडी :
गाडी संख्या 07531 हि विशेष गाडी पंढरपूर येथून दिनांक 12 नोव्हेंबर -2024 ला सकाळी 08.15 वाजता सुटेल आणि कुरडूवाडी, बारसी टोवून, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी., पूर्णा मार्गे नांदेड येथे रात्री 20.40 वाजता पोहोचेल.

 

3. गाडी क्रमांक 07532 नांदेड ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी :
गाडी संख्या 07532 ही विशेष गाडी हजुर साहिब नांदेड येथून दिनांक 14 नोव्हेंबर ला सायंकाळी 19.20 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टोवून, कुरडूवाडी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी 07.30 वाजता पोहोचेल.

 

4. गाडी क्रमांक 07502 पंढरपूर-आदिलाबाद अनारक्षित विशेष गाडी :
गाडी संख्या 07502 हि विशेष गाडी पंढरपूर येथून दिनांक 15 नोव्हेंबर -2024 रोजी रात्री 20.00 वाजता सुटेल आणि कुरडूवाडी, बारसी टोवून, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हडगाव रोड, हिमायत नगर, सहस्तरकुंड, धोनोरा, बोधडी, किनवट मार्गे आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता पोहोचेल.
गाडीचे थांबे आणि वेळापत्रक सोबत जोडले आहे.

 

5. गाडी क्रमांक 07517 बिदर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी :
गाडी संख्या 07517 ही विशेष गाडी बिदर येथून दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रात्री 22.15 वाजता सुटेल आणि भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टावून, कुरडूवाडी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 06.20 वाजता पोहोचेल.

 

6. गाडी क्रमांक 07518 पंढरपूर-बिदर अनारक्षित विशेष गाडी :
गाडी संख्या 07518 ही विशेष गाडी पंढरपू येथून दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रात्री 20.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच बिदर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल.

kartiki yatra special trainpandharpur trainsspecial train for pandharpur pandharpur train detalsकार्तिकी एकादशीपंढरपूरसाठी विशेष गाड्या
Comments (0)
Add Comment