परभणी : शहरी भागात दररोज वेगवेगळ्या भागात वसाहतीसह काँलनी आणि बाजारपेठेत तसेच संघटनांच्या बैठका आणि संवाद साधून मतदारांच्या अडीअडचणी आमदार डॉ.राहूल पाटील हे जाणून घेत आहेत. समस्या आणि प्रश्न कोणताही असो तो निश्चित येत्या काळात लवकरच सोडविला जाईल, असे ठोस आश्वासन आमदार डॉ.राहूल पाटील यांच्याकडून दिले जात आहे. त्यामुळे या प्रचार दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परभणी शहर, ग्रामीण भागात महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार तथा आमदार राहुल पाटील यांचा दौरा सुरू आहे. दररोज संवाद दौऱ्यामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच शहरी भागात सुद्धा विविध वसाहती, व्यापारी बाजारपेठ, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, भक्कम साथ देत सोबत राहणाऱ्या विविध संघटनांची सुद्धा आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडून भेट घेतली जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आमदार राहुल पाटील आणि पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व मतदार संघ पिंजून काढत आहेत. संवाद दौऱ्यात आमदार पाटील यांच्या समवेत शहरी भागात प्रमुख पदाधिकारी हे बैठकांचे, मेळावे, सभेचे नियोजन करीत आहेत. ग्रामीण भागातील संवाद दौऱ्यात त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत परिश्रम घेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील संवाद दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
४० वर्षांचे प्रश्न १० वर्षात मार्गी लावले
विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक कामे पूर्ण करण्यात यश आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि बंधाऱ्याचे बांधकाम यास विशेष प्राधान्य दिले. गावकऱ्यांनी मागणी करताच असे अनेक बंधारे त्वरित बांधण्यात आले. जवळपास दीडशे बंधाऱ्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे मतदारसंघ रस्ते, पूल आणि बंधारे बांधकामाने समृद्ध बनविल्याचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले.
वडील, पत्नी यांचाही प्रचारात सहभाग
परभणी विधानसभा मतदारसंघात शहर आणि ग्रामीण भागामध्ये आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंबीय दररोज भेटीसाठी घेत आहेत. प्रचारामध्ये त्यांनी सुद्धा आघाडी घेतली आहे. यामध्ये आमदार डॉ.राहुल पाटील यांचे वडील डॉ.वेदप्रकाश पाटील, आ.डॉ. पाटील यांच्या पत्नी डॉ. संप्रिया पाटील या सुद्धा दररोज महिला आघाडीच्या मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना विविध प्रकारच्या योजनांची माहिती देऊन आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या पाठीमागे मतदान रुपी भक्कम ताकद दाखविण्याचे आवाहन केले.