सेलू, प्रतिनिधी – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त सेलू (जि.परभणी) येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रातर्फे रविवारी (दोन जानेवारी) आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, नैतिक मूल्यांची रुजवणुक व्हावी, या उद्देशाने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. या वेळी केंद्र उपसंचालिका बीके सविताबहेन, बीके राधाबहेन, बीके राधिकाबहेन, बीके योगिताबहेन, बीके मीराताई यांची उपस्थिती होती. स्पर्धकांनी निरोगी जीवन, ध्यान साधना, माझे कुटूंब-माझे संस्कार, मी पाहिलेले निसर्गरम्य दृश्य, स्वच्छ घर-स्वच्छ परिसर आदी विषयांवर आपल्या कल्पनेतील चित्र कॅनव्हासवर चित्तारले. स्पर्धास्थळी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रविंद्र पाठक, सय्यद हमीद, इंजि. बी.एस.कोलते यांनी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, असे बीके सविताबहेन यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बीके रंगनाथभाई, श्रीरंगभाई, प्रभाकरभाई, कलाशिक्षक सुनील मोरे, आर.व्ही.चव्हाण, रामकिशन कटारे, पांडुरंग पाटणकर, फुलसिंग गावीत, बाबासाहेब हेलसकर, बी.बी.सूर्यवंशी, अनिल कौसडीकर, अरूण रामपुरकर, जी.आर.साळवे, काशिनाथ पल्लेवाड, भगवान पावडे, बबन राठोड, कीर्ती राऊत, स्वाती हेलसकर, प्रा.सुषमा सोनी, सुरेखा पाटवकर,ओमभाऊ सोनी, माधव गायकवाड, नरेश पाटील, के.व्ही.आरदवाड, श्रीनिवास नंदेवाड, शशिकांत बिहाडे आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
नूतन विद्यालय, न्यू हायस्कूल, शारदा विद्यालय, नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कूल, नूतन प्राथमिक शाळा, यशवंत प्राथमिक शाळा, श्री के.बा. विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, व्हिजन इंग्लिश स्कूल,, प्रॉस्परस इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल, डॉ.झाकीर हुसेन शाळा, विवेकानंद प्राथमिक विद्यालय, जिजामाता बाल विद्या मंदिर, ज्ञानतीर्थ विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.