मुंबई – दक्षिण मुंबईतील हातावर कमावून खाणाऱ्या काही बांधवांना ‘लॉकडाऊन’ मुळे गेले काही दिवस जेवण मिळणे कठीण झाले आहे. त्यांना मदत म्हणून तेथील मूर्तझा नावाचा तरुण व त्याचा ग्रुप लोकांकडूनच निधी गोळा करून या हातावरच्या पोट असणाऱ्या लोकांना काही दिवस २ वेळचे जेवण स्वतः बनवून देत होते.
याची माहिती ग्रुप मधल्या एका मुलीकडून spreading smiles अँड lighting lives नावाच्या वसई येथील ग्रुप ला मिळाली. त्यानंतर या ग्रुपच्या सभासदांनी संबंधितास संपर्क करुन आवश्यक असलेल्या मदतीचे स्वरुप समजावून घेतले. सर्व सभासदांनी मिळून ११००० रुपये रोख जमा करुन मूर्तझाला सुपूर्द केली.
ही देणगी आपल्या ग्रुपकडून त्या उपाशी आणि गरजू बांधवांना मदत दिली गेली आहे. यातून त्यांना काही दिवसांचे पोटभर जेवण देण्यात येईल. आता त्यांना भातासाहित भाकरीही मिळणार आहे. या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होत असल्याचे ‘Spreading Smiles and Lighting Live’ या ग्रुपच्या सभासदांनी शब्दराजशी बोलताना सांगितले.
पालघर जिल्ह्यात आम्हाला शक्य होईल तशी लहान सहान समाजोपयोगी काम आम्ही करत असतो. लाॅकडाऊनच्या काळात असे अनेक समाजोपयोगी हात पुढे यायला पाहिजे. जेणेकरुन माणुसकी जपली जाईल असे ही या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
सातत्याने आपापले काम सांभाळून सामाजिकतेचे भान ठेऊन काम करणाऱ्या या तरुणाईचे या परिसरात मोठ्या प्रमाणात कौतूक केले जात आहे.