सेलू / प्रतिनिधी – नुकत्याच झालेल्या शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत एकूण 34 विद्यार्थी एलिमेंट्री परीक्षेसाठी व एक विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत ज्यामध्ये सुमित सोनाजी सोळंके हा विद्यार्थी A ग्रेड तर आदित्य गेरकर हा विद्यार्थी ब ग्रेड प्राप्त करून उत्तीर्ण झालेले आहेत.
32 विद्यार्थी क ग्रेड मिळून उत्तीर्ण झालेले आहेत.या यशाबद्दल शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे,जेष्ठ शिक्षक संजय धारासुरकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोनाजी सोळंके,किशोर खारकर,शुभांगी भाग्यवंत,संदीप जोशी,कृष्णा पांचाळ,सेवक विठ्ठल काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,सचिव महेशराव खारकर तसेच सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.