परभणीतील उरुसाला प्रारंभ,मानाचा संदल निघाला

परभणी, दि. १  : सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब रहे. (तुरतपीर बाबा दर्गा) दर्गा एकात्मतेचे प्रतिक असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब रहे यांच्या मानाच्या संदलची शहरातून मिरवणुक काढुन ऊरूस यात्रेची सुरुवात झाली.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी संदलचा तबक डोक्यावर घेवून संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब रहे यांच्या ऊरूस यात्रेला मानाच्या संदलाने सुरुवात झाली. नागरिकांनी या उर्स उत्सवात सहभागी होवून कायदा व सुव्यवस्थाचे पालन करून शांततेत पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यावेळी वक्फ मंडळाचे विभागीय अधिकारी शेख सलमान उरुस समितीचे व्यवस्थापक, जिल्हा वक्फ अधिकारी इमरान खान आदीसह भाविक उपस्थित होते. मागील अनेक वर्षापासून या मानाच्या संदलची परंपरा आजतागायत कायम असून, या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात.
***

Comments (0)
Add Comment