पोखर्णी येथील राजू वाघ यांना राज्यस्तरीय वृक्ष सखा पुरस्कार

परभणी,दि 24 ः
रोजगार संघ नागपूर यांच्यातर्फे दर वर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन कार्यासाठी दिला जाणारा “राज्यस्तरीय वृक्षसखा पुरस्कार 2024-25” पोखर्णी नृसिंह येथील संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष वृक्षमित्र राजू वाघ यांना मिळाला आहे.
राजू वाघ हे मागील 10 वर्षांपासून संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोखर्णी येथील वृक्षमित्र टीमला सोबत घेऊन गावातील परिसर तसेच गावातील स्मशानभूमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून गावात संत गाडगेबाबा स्वच्छ, सुंदर स्मृती उद्यान साकारले आहे. राजू वाघ हे जिजाऊ ज्ञानतीर्थ विदयालय मानवत रोड शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या शाळेत देखील विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देत असतात. तसेच विद्यार्थ्यांकडून शेकडो झाडे लावून घेऊन त्यांचे पालन पोषण करण्याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या वृक्ष प्रेमामुळे तसेच त्यांनी केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यामुळे नागपूर येथील रोजगार संघ या संस्थेने हा पुरस्कार राजू वाघ यांना दिला.
रोजगार संघ ही असंख्य प्रेरणादायी पुस्तकांचे लेखक प्रा. संजय नाथे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील काही ध्येयवादी तरुणांनी एकत्र येत चालवलेली लोक चळवळ आहे. तरुणांचा आणि गावांचा शाश्वत विकास हे स्वप्न उराशी घेऊन रोजगार संघ वाटचाल करीत आहे.
दर वर्षी जास्तीत वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करतील अशा पर्यावरण संवर्धन करणाऱ्या पर्यावरण प्रेमीना हा पुरस्कार दिला जातो. राजू वाघ यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संकल्प फाउंडेशन तसेच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दैनिक शब्दराज परिवाराकडून राजु वाघ यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment