सेलू / नारायण पाटील – सेलू शहरात नव्यानेच तयार झालेला राज्य रस्ता क्रमांक २५३ (अरबी मदरसा ते शिवाजी महाराज उद्यान )हा जरी वाहतुकीसाठी चांगला झाला असला तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानदारांना व ग्राहकांसाठी मात्र अडचनीचा ठरत आहे .कारण मुख्य रस्त्याच्या उंची मुळे दुकानात अथवा बँकेत जाण्यासाठी अडचणीचे बनत चालले आहे .त्यामुळे प्रचंड नाराजी पसरत असून याबाबत प्रशासनाने त्वरित कांही तरी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे .
शहरातील शिवाजी महाराज उद्यान ते परभणी रोड वरील अरबी मदरसा या मुख्य रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी आला .परंतु हा राज्य रस्ता होणार असल्यामुळे नगर परिषदेला सदरील ५.२ किमी व २४ मीटर रुंद असलेला हारस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा लागला .निधी उपलब्ध होताच या रस्त्याचे मोजमाप करण्यात आले . व रस्त्याच्या रुंदीच्या खुणा देखील करण्यात आल्या. परंतु बऱ्याच ठिकाणी रस्त्याची रुंदी बाजूला असलेल्या दुकानामुळे व घरामुळे कमी भरत होती .मोजमाप केल्या नंतर टाकण्यात आलेल्या खुणा या कांही ठिकाणी दुकानात तर काही ठिकाणी घरात जवळपास दोन ते तीन फुटापर्यंत जात होत्या .त्यामुळे रस्ता जर करावयाचा असेल तर सदरील दुकाने व घरे पडणार होती .याबाबत शहरात बऱ्याच उलट सुलट चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाल्या .तसेच अर्जबाजी देखील झाली .त्यामुळे हा रस्ता कसा होतो .खुणा केलेल्या जागे पर्यंत होतो का कांही पळवाट काढली जाते याबाबत देखील चर्चा सुरू होती .दरम्यान रस्त्याचे काम सुरू झाले व नियोजित केलेल्या खुणा पेक्षा रुंदी कमी करण्यात आली .यामुळे जिथे अडचण येणार होती त्यांचा प्रश्न मिटला परंतु शिवाजी महाराज उद्यान पासून नगर परिषदे पर्यंत व पुढे देखील काही ठिकाणी रस्ता व दुकान यामध्ये अंतर पडले .व रस्ता उंच झाल्याने रस्ता व दुकान यामध्ये खड्डा तयार झाला .याचाच परिणाम सदरील दुकानदार व त्यांचे ग्राहक यांना त्यांच्या टूव्हीलर रस्त्यावरच ठेवाव्या लागत आहेत .त्यामुळे रस्त्याच्या कडेला टू व्हीलर ची मोठी रांगच लागत आहे .या रस्तावर असलेल्या साईबाबा बँकेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असल्यामुळे तर तिथे रस्त्यावरच टू व्हीलरची गर्दी होत आहे .व याचा त्रास रहदारील होत आहे .परंतु याबाबत ग्राहकांचा देखील नाविलाज आहे .रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे असल्यामुळे गाडी मध्ये नेता येत नाही .विशेष म्हणजे या रस्यावर फोर व्हीलर्ची देखील चांगलीच वर्दळ असते .बाजूलाच स्वस्त धान्याचा शासकीय गोदाम असल्यामुळे जर त्यांचे मालवाहू मोठे ट्रक आले तर या टू व्हीलरच्या गर्दीतून गाडी बाहेर काढणे जिकरीचे बनत आहे .
सदरील रस्ता होऊन जवळपास दोन महिने होत असून रस्त्याच्या कडेला दुकान पर्यंत असलेल्या खड्डयाची जबाबदारी कोणाची आहे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे .कारण हा रस्ता नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असल्यामुळे ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची की नगर पालिकेची का संबंधित दुकानदारांची हेच कळत नाही .
तात्पर्य हेच की रस्ता जरी वाहतुकीसाठी चांगला झाला असला तरी दुकानावर व बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र अडचणीचाच ठरत आहे .हे नक्की