परभणी,दि 21 ः
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे परभणकडे जात असताना पोखर्णी फाटा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना परभणी जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल यांना मिळणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी बंद करण्यात आला तो निधी परत सुरू करावा याबाबत चे निवेदन शेख इम्रान बाबू (भाजप अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष ग्रामीण )यांच्या वतीने देण्यात आले. परभणी येथील परभणी येथील पार्वती अंभोरे हॉस्पिटल, देवगिरी हॉस्पिटल, परभणी आयसीयू यांना मिळणारा मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधी या अगोदर मिळत होता परंतु काही कारणास्तव मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्रातून बंद करण्यात आला त्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांना याचा फटका बसत आहे.त्यामुळे शासनस्तरावर याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनात पाशा पटेल यांच्याकडे करण्यात आली आे.