परभणीत महायुतीत खडा..भाजपाच्या बैठकीत भलतंच ठरलं…आता काय होणार……

परभणी,दि 13 ः
आता पर्यंत लोकांचे घर भरल, पण आता आमचं ठरलंय  अशा घोषणा देत परभणी विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमीक घेत मित्रपक्षाच काम करणार नसल्याचा निर्धार केला.यामुळे जागावाटपा आधीच महायुतीत रणकंदण माजणार आहे.तसेच मित्रपक्षाची वाटचाल देखील अवघड होऊन बसणार आहे.

 

परभणी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हा भाजप पक्षाचा असावा अशी तीव्र इच्छा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.त्या अनुषंगाने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र भाजपचाच उमेदवाराला तिकीट मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न परभणी विधानसभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने केले जात आहेत. परंतु महायुतीकडून विधानसभेचे तिकीट मित्र पक्षातील शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे चित्र सध्या दिसत असल्याकारणाने भाजपतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. याचं महत्वपूर्ण मुद्द्यावर भाजपा परभणी विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची कार्यकर्त्याची महत्त्वाची बैठक आज आयएमए हॉल घेण्यात आली.

 

या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षाला उमेदवारी देण्यास विरोध केला.कोणत्याही मित्र पक्षाच्या उमेदवार याचे काम करणार नाही असा  ठरावच घेतला,2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता मित्र पक्षाचा उमेदवार घोषित करून उमेदवार देण्यात आला .ही बाब अतिशय चुकीची आहे असा नाराजीचा सुर सुद्धा या बैठकीत प्रमुख पदाधिकारी यांनी व्यक्त करत महायुतीचा उमेदवार कसा चुकीचा होता हे दाखवुन दिले.

 

जिल्ह्यातील दुसरी कुठलीही जागा मित्र पक्षालो सोडा परंतु परभणी भाजपालाच राहु द्या अशी मागणी करण्यासाठी
15 ऑक्टोबर रोजी परभणी येथील भाजपाचे शिष्ठमंडळ मुंबई येथील पक्ष श्रेष्ठी यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

या बैठकीला ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, भाजपा समनव्यक  डॉ केदार खटिंग, शहर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख ,मोहन कुलकर्णी, संजय रिझवानी, मंगला मुदगलकर , कमल किशोर अग्रवाल ,रितेश जैन , मुकुंद खिल्लारे , श्रीमती मठपती श्रीमती नरवाडकर, दिनेश नरवाडकर , जलील पटेल.उमेश शेळके,डॉ मनोज पोरवाल,अक्षय डहाळे यांच्या सह मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष्याचे परभणी विधानसभेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

parbhani breaking newsparbhani mahayuti newsparbhani politicsparbhani rajkaranparbhani vidhansabhavidhansabha election 2024परभणी महायुतीपरभणी राजकारणपरभणी विधानसभा
Comments (0)
Add Comment