विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे- प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

 

सेलू / प्रतिनिधी – तुमचा अभ्यास झालेला आहे. तुम्ही गुणवंत आहात. नक्कीच यशस्वी व्हाल. त्यामुळे परीक्षेची कुठलीही भिती मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्चमाध्यमिक विभागातील बारावी वर्गातील विद्यार्थीनीच्या शुभेच्छा समारंभात मंगळवार ( दि.०४ ) रोजी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निशा पाटील या होत्या. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. संजना बाहेती, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, भालचंद्र गांजापुरकर यांची उपस्थिती होती. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी ‘ परीक्षेला जाताना….’ या विषयावर पुढे बोलताना म्हणाले की, ‘ विद्यार्थीनींनी एकाग्रतेने अभ्यास करावा. अभ्यासक्रमातील प्रत्येक पाठ संकल्पना समजून घ्यावी. वेळेचे नियोजन करून अभ्यासासह नियमित पुस्तके, वर्तमानपत्र वाचावीत. भविष्याच्या दृष्टीने स्वतःला सक्षम बनवावे. ‘

 

अभ्यासासह एक तरी छंद जोपासा

डॉ. संजना बाहेती यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, ‘ विद्यार्थीनींनी शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. केवळ गुणांसाठी नाही तर आयुष्याच्या लढाईसाठी तयार व्हावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यासासह आपला एक तरी छंद जोपासा. ‘ असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकरावीच्या विद्यार्थीनींसह उच्चमाध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सपना काला, प्रा. स्नेहल दगडू, प्रा. रविंद्र कदम, प्रा. विजय धापसे, किशोर ढोके यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. सुरेश हिवाळे केले. पाहुण्यांचा परिचय अंकीता आवटे हिने करून दिला. सुत्रसंचलन प्रतिक्षा ठोकरे , वैष्णवी मोगल हिने केले. तर आभार प्रदर्शन दिव्या डंबाळे या विद्यार्थीनीने केले.

Comments (0)
Add Comment