सेलू / प्रतिनिधी – इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे.आपल्याला समाजात वावरताना इंग्रजीचा उपयोग होतो.परंतु विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाची नाहक भीती आहे.विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा अभ्यास व्यवस्थित केल्यास व या विषयाकडे आवडीने पाहिल्यास नक्कीच भीती दूर होते यासाठी कार्यशाळा चांगले माध्यम आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय इंग्रजी विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सर्वप्रथम दर्पण दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर ,श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उदघाटन शाळेचे संचालक सदस्य डॉ प्रविण जोग, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव तसेच परभणी जिल्हा इंग्लिश विषयाचे समन्वयक धनंजय भागवत, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, जोशी, विजय आवचार, अभिमान पाईकराव आदींची उपस्थिती होती.
या एकदिवसीय कार्यशाळेस श्री केशवराज विद्यालय, न्यू हायस्कूल, शारदा विद्यालय, नितीन माध्यमिक विद्यालय, आ बोरगाव, अनुसूचित जाती निवासी शाळा, पावडे हादगाव आदी शाळांनी यात सहभाग घेतला. या कार्यशाळेत इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व ती कशी सोडवायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन विजय आवचार, मुख्याध्यापक एडके, अभिमान पाईकराव व धनंजय भागवत यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक धनंजय भागवत यांनी केले. सुत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी तर आभार सिद्धार्थ एडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विठ्ठल काळे, अण्णासाहेब गायकवाड,बाबासाहेब बदाले आदींनी परिश्रम घेतले.