पाथरी, प्रतिनिधी – अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी सलग्न असणाऱ्या पाथरी तालुक्यातील पत्रकारांची बैठक दि. २ जानेवारी रविवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी सलग्न असणाऱ्या तालुक्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी सुधाकर गोंगे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गजानन घुंबरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पाथरी तालुका पत्रकार संघाची इतर कार्यकारणी निवड करण्यात आली यामध्ये सचिव धनंजय देशपांडे, सहसचिव रमेश बिजुले, कोषाध्यक्ष खालेद नाज, कार्याध्यक्ष सिद्धार्थ वाव्हळे, जिल्हा प्रतिनिधी मोहन धारासूरकर, सल्लागार म्हणुन विठ्ठलराव भिसे, सुनिल उन्हाळे, सहसल्लागार लक्ष्मण उजगरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.