सुरभी महोत्सव- जल्लोष तरुणाईचा सांस्कृतिक कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद

सेलू ( नारायण पाटील)
श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या सुरभी महोत्सव निमित्त आज अपूर्वा पॉलीटेक्निक ,आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डॉ.राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालय,आदित्य अध्यापक विद्यालय व आदित्य ज्युनिअर कॉलेज प्रस्तुत जल्लोष तरुणाईचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. संदीप भैय्या लहाने, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मनीष कदम, श्री. दिलीप डासाळकर, श्री.शिवाजी आकात, श्री.श्रीपाद कुलकर्णी, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.सविताताई रोडगे,
डॉ.अपूर्वा रोडगे (पारवे), प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्राचार्य श्री.अशोक बोडखे, प्रा. अक्षय बन,डॉ.बबन सोनवणे, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, डॉ.नीलिमा सिंग, प्रा. गणेश सोळंके, प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षीरसागर, सौ. शालिनी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना सेलू व परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे दार सुरू करावे व सर्वसामान्य परिवारातील विद्यार्थ्यांना सेलू या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण घेता यावे, तसेच प्रत्येक कुटुंबातील एक तरी विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा रहावा व त्याने आपल्या परिवाराचा उद्धार करावा या भावनेतून सुरू केलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षण घेत असून नामांकित कंपनी मध्ये सध्या नोकरी करत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो असे मनोगत डॉ. संजय रोडगे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
सध्याची शैक्षणिक प्रगती पाहता भविष्यामध्ये माननीय डॉ. संजय रोडगे हे सेलू शहरासाठी एक शिक्षण महर्षी म्हणून नवी उंची निर्माण करतील व एक स्वतःचे विद्यापीठ स्थापन करतील असा विश्वास याप्रसंगी मा. श्री संदीप भैय्या लहाने यांनी व्यक्त केला.
श्रीराम प्रतिष्ठान दरवर्षी सुरभी महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना जे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांचे ध्येय प्राप्ती करण्यासाठी निश्चित होत आहे असे मनोगत आपल्या भाषणात श्री.श्रीपाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सेलू व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिस्तप्रिय संस्थेमध्ये प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्वल करावे अशी इच्छा मा. श्री. दिलीप डासाळकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

जल्लोष तरुणाईचा या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी एकास सरस एक असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव तर आभार प्रदर्शन प्रा. विनायक थेटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व घटक संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment