नूतन कन्या प्रशालेत तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न

 

सेलू / प्रतिनिधी – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सेलू, स्वर्गीय सौ.दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन कन्या प्रशालेत तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन २९ जुलै रोजी करण्यात आले होते .

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील होत्या .तर प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल ,स्पर्धेचे परीक्षक एस .डी .पाटील ,प्रमोद देशमुख, प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरुवात कै.दुर्गाताई कुलकर्णी आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली .
यावेळी “खरा तो एकची धर्म ” ही प्रार्थना रेणुका अंबेकर हिने सादर केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे यांनी केले. यावेळी सेलू तालुक्यातील 18 स्पर्धकांनी या कथाकथन स्पर्धेत सहभाग नोंदवत अनेक संस्कारक्षम, बोधपर कथा सांगत श्रोत्यांची मने जिंकली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार कीर्ती राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील मोगल ,वैशाली चव्हाण, शशिकांत देशपांडे, यशोदा चव्हाण ,रूपाली पवार, सुरेखा भांबळे, सोलापूरे प्रणिता, सोनाली कुबरे, सुरेश हिवाळे यांनी सहकार्य केले

Comments (0)
Add Comment