विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने करणारा परीस म्हणजे शिक्षक-डी. डी. सोन्नेकर

सेलू,दि 06 ः
भविष्यातील आव्हानासाठी लढणाऱ्या पिढीला दिशादर्शकाची भूमिका शिक्षक बजावतो.विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेहमी प्रोत्साहीत करतो.उत्तम नागरिक व संस्कारशील पिढी तयार करतो ,शिक्षक केवळ पुरस्काराचा आकांक्षी नसतो तर खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचे मोलाचे कार्य करतो.म्हणूनच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने करणारा परीस शिक्षक असतो असे प्रतिपादन नूतन विद्यालयातील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक डी. डी. सोन्नेकर यांनी विवेकानंद विद्यालयात आयोजित (०५ सप्टेंबर गुरुवार ) शिक्षकांच्या गौरव सोहळ्यात केले.
प्रारंभी सर्वज्ञ चक्रधर स्वामी ,अहिल्याबाई होळकर ,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी ,उपेंद्र बेल्लुरकर ,करुणा कुलकर्णी ,शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले विचार मांडले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनिल कौसडीकर यांनी करून दिला.संस्थेतर्फे विद्यालयातील सर्व शिक्षकांचा गौरव व सत्कार करण्यात आला.इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गात दर महिना घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
सूत्रसंचालन गजानन साळवे ,पद्य दीपाली पवार ,आभार विजय चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment