शिक्षक हा राष्ट्रउभारणीतील महत्वाचा घटक : प्राचार्य संजय जोशी

परभणीः येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्या डॉ. वैशाली देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य संजय जोशी उपस्थित होते. तर यावेळी व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष नाकाडे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य संजय जोशी म्हणाले की, राष्ट्रउभारणीत एक महत्वाचा खांब म्हणून शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असून शिक्षक हे काम अतिशय समर्पित भावनेने करत आहेत याचा आनंद असून विद्यार्थ्यांनीही आपल्या आई-वडील, शिक्षक व देशाचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन केले.
यावेळी आयेशा सय्यद या विद्यार्थिनीने स्वागत गीत सादर केले.त्यानंतर इंग्लिश गोल्डन क्लबच्या आयेशा खान, नगमा शेख, शबाना शेख, करण गायकवाड,संविधान सहजराव, तालेब सोमई, सानिका चव्हाण, प्रतिमा अंभोरे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मुस्कान खान,आयेशा खान व प्रा. डॉ. सचिन खडके व प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा सर्व विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन गौरव केला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्या डॉ. वैशाली देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत आई वडीलानंतर शिक्षकाचे जीवनातील स्थान अत्यंत महत्वाचे असल्याचे मत प्रतिपादन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा अंभोरे व सानिका चव्हाण यांनी, प्रास्ताविक तालेब सोमई यांनी तर आभारप्रदर्शन आदिती काजनवार यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. सौ. वर्षा सूर्यवंशी, प्रा. आशिष टिकोळे व सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment