ठाकरे पिता – पुत्रांचा फोटो हटवला, विधिमंडळ पक्ष कार्यालयावरही शिंदेशाही

: नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद पाहण्यास मिळाला आहे. अधिवेशनामध्ये दोन्ही पक्षांना वेगळी कार्यालय देण्यात आली आहे. जुनं कार्यालय हे शिंदे गटाला मिळालं त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले.
नागपूर विधानभवनात शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालयं देण्यात आली आहे. ठाकरे गटाला आणि शिंदेंच्या पक्षाला वेगवेगळं कार्यालय देण्यात आलंय. पूर्वीचं शिवसेनेचे कार्यालय शिंदेंच्या पक्षाला मिळालं आहे. त्यामुळे या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

तसंच कार्यालयाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालय असा फलकही लावण्यात येणार आहे. सुरुवातीला ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षाला शेजारीशेजारी कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र यामुळे कोणताही वाद होऊ नये यासाठी आता पूर्वीचे शिवसेनेचे कार्यालय शिंदे पक्षाला तर ठाकरेंच्या पक्षाला कार्यालयासाठी नवी जागा देण्यात आली आहे..

Comments (0)
Add Comment