कॉपीमुक्त अभियानाला पूर्णा तालुक्यात हरताळ..45 विद्यार्थ्यांवर कारवाई

पूर्णा,दि 17 ः
उच्च माध्यमिक परीक्षेच्या काळामध्ये कोणीही कॉपी करू नये, यासाठी प्रशासन, पोलिस व शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली होती. असे असतानाही पुर्णा व कावलगाव केंद्रावर 45 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून यामुळे कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लागले आहे.

पूर्णा तालुक्यात ११ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. . परीक्षा केंद्रावर प्रवेश करतानाच विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रवेश देत त्यांची तपासणी करण्यात येत होती. योग्य ती खबरदारी घेऊनही पूर्णा तालुक्यातील कावलगाव व पूर्णा येथे एकूण 45 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. माध्यमिक विभागातील वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने पूर्णा शहरातील व कावलगाव येथील केंद्र वर 45 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याने कॉपीमुक्त अभियानाला तालुक्यात मात्र गालबोट लागल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Comments (0)
Add Comment