सेलू ( नारायण पाटील )
राज्यात बऱ्याच ठिकाणी वरुण राजाची चांगलीच कृपा होत असली तरी सेलू तालुक्यात मात्र अजूनही पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही . सद्यस्थितीत होणार पाऊस जरी पिकांच्या वाढीसाठी पुरेसा होत असला तरी जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे . तालुक्यातील लोअर दुधना पाणलोट क्षेत्रात देखील अद्यापही पुरेसा पाऊस झाला नसल्या मुळे “पिकांना पोटभर तर धरणाला घोटभर “अशीच परिस्थिती झाली आहे .
पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला असला तरी अजूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही .त्यामुळे धनासाठी जरी पाऊस पुरेसा होत असला व पिके चांगली असली तरी जमिनीतील पाणी पातळी अजूनही वाढलेली नाही .व विहिरीचे पाणी पातळीत देखील वाढ झालेली नाही .
तालुक्यासाठी वरदान ठरणारा व सेलू शहराची तहान भागवणारे लोअर दुधना धरण मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे .
गेल्या वर्षीच्या दिवशी या धरणाची जिवंत पाणीसाठा पाळली २७.२७% होती .जी आज केवळ ७.७६% आहे .
धरणाची पाणी पातळी वाढण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे .