नांदेड येथील संजय बियाणी यांच्या हत्येचा सेलूत माहेश्र्वरी समाजाकडून निषेध

 

सेलू,दि 06 (प्रतिनिधी)ः
नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शारदानगर येथील स्वतःच्या घरापुढे गाडीतून बाहेर येत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञाताने गोळीबार केला . व या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला . यावेळी त्यांचे चालक देखील जखमी झाले आहेत . या घटनेचा सेलू येथील राम बाग मीञ मंडळ , सेलू तालूका माहेश्र्वरी सभा ,बालाजी मंदिर ट्रस्ट ,व्यापारी असौसिएशन ,सेलू ईडस्टीज तसेच न्यू व्यापारी असिशिअशन यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी सेलू याना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनावर रामेश्र्वर राठी ,विजय बिहानी ,नंदकिशोर बाहेती , अवीनाश बीहानी , नवल काबरा ,प्रवीन लोया ,विशाल लोया , विपीन मंञी , प्रकाश सोमामी , विनय सोनी डाँ सतीश भाला ,बबलु दायमा ,संजय परताणी या सह समाज बाधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Comments (0)
Add Comment