इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp यूजर्सचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी कंपनीकडून नवीन अपडेट आणि फीचर्स आणले जात आहे. आता कंपनी व्हिडीओ कॉल मेंबर्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. WhatsApp व्हिडीओ कॉल मध्ये जास्तीत जास्त ३२ मेंबर्सला अॅड करण्याची सुविधा जारी केली जाणार आहे. म्हणजेच यूजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान ३२ लोकांना एकाचवेळी जोडू शकता. या सुविधेला WhatsApp वेब यूजर्ससाठी आणले जाऊ शकते. WABetaInfo ने व्हॉट्सअॅपच्या या फीचरसंबंधी माहिती दिली आहे. इंस्टेंट मेसेजिंग अॅपने नुकतीच Silence unknown callers ला जारी केले आहे. WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, WhatsApp विंडोजसाठी आणखी एक फीचरवर काम करीत आहे. यूजर्सला ३२ लोकांपर्यंत व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी देईल. ही सुविधा सध्या टेस्टिंग मोड मध्ये आहे. तसेच काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे.
आता जास्तीत ८ लोक होऊ शकतात अॅड
सध्या विंडोज अॅपसाठी व्हॉटसअॅप ८ लोकांना ग्रुप व्हिडीओ कॉल आणि ३२ लोकांपर्यंत ग्रुप व्हिडीओ कॉलची परवानगी देतो. काही बीटा टेस्टर्स आता लेटेस्ट अपडेट, व्हर्जन 2.2324.1.0 साठी मोठ्या ग्रुप व्हिडीओ कॉल करू शकते. जे मायक्रोसॉफ्ट स्टोरवर आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, मेसेज मध्ये म्हटले की, व्हॉट्सअॅप वेब यूजर्स अॅप ३२ लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट आणि ग्रुप व्हिडीओ कॉल करू शकता. कंपनी लवकरच या फीचरला सर्व यूजर्ससाठी जारी केले जाऊ शकते.
सायलेंट अज्ञात कॉलर फीचर
सायलेंट अज्ञात कॉलर फीचरला व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी फीचर म्हणून आणले गेले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या माहितीनुसार, या फीचरच्या मदतीने अज्ञात नंबरवरून कॉल पासून सुटका मिळेल. या फीचरच्या मदतीने अज्ञात नंबरवरून कॉल्सला ऑटोमेटिक सायलेंट केले जाऊ शकते.