वालुर येथील तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले

पत्नी व दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल

 

 

सेलू / प्रतिनिधी – पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून मृत्यू झालेल्या तरुणाचे गूढ अखेर उकलले असून त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पत्नी व दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

दि १८ सप्टेंबर रोजी सकाळी सात च्या सुमारास वालुर येथील सखाराम लक्ष्मण दराडे हा २८ वर्षीय तरुण हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून पडल्याने विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर मयताच्या चुलत भावाने दिल्या वरून सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

परंतु मयताच्या वडिलांनी दि ७/१०/२४ रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार मयताची पत्नी रेखा सखाराम दराडे ,दत्ता नारायण सोनवणे व कृष्णा मलिकार्जुन चेंडे तिघे राहणार वालुर या तिघांनी संगनमत करून माझा मुलगा सखाराम यास जून २०२३ पासून सतत मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले अशी फिर्याद मयताचे वडील लक्ष्मण सटवाजी दराडे वय ७५ यांनी सेलू पोलिसात दिली .

 

सदरील फिर्यादीवरून सेलू पोलिसात मयताची पत्नी व दोन तरुणांच्या विरोधात गु र नंबर ४९९/२०२४ कलम १०८,३(५) भा. न्या.सं .२०२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहे .

Comments (0)
Add Comment