राज्यघटना वाचवण्यासाठी बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज- व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांचे प्रतिपादन

परभणी,दि 25 ः
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वतःची राज्यघटना नव्हती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशाचा व ग्रंथाचा दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवस सखोल अभ्यास करून भारतीय राज्यघटना लिहिली.परंतु आज काही राजकीय पक्षांचे नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. त्यामुळे भारतीय राज्यघटना  वाचवण्यासाठी बहुजन समाजाने एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांनी केले.

मौजे निळा ता. पुर्णा येथे बुधवारी (दि.24 )  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्याख्याते विनोदअण्णा भोसले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निळा गावचे सरपंच श्री रमेशराव सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून भंतेजी पंयावंश, उप सरपंच श्री मंचकराव सुर्यवंशी,देशोन्नतीचे पत्रकार सुरेश मगरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना भोसले म्हणाले की, आपल्या महापुरुषांना जाती पातीच्या चौकटीत बंदिस्त करून काही समाजकंटक समजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुजन समाजानी हे षडयंत्र ओळखून सर्व महापुरुषांची जयंती सार्वजनिक रित्या आनंदात साजरी केली पाहिजे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मासे यांनी  तर आभार दीपक मासे यांनी केले.

Comments (0)
Add Comment