पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं.. सुरेश धस यांचा मोठा दावा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली ही वाल्मिक कराड यांनी केली होती, म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहेत. गडचिरोलीतील एकाची बदली वाल्मिक कराड यानी करून आणलेले आहे. गडचिरोलीतील बदली करून आणलेल्याने त्याची स्वामिनिष्ठा त्याने दाखवू नये. काही लोक अतिशय संपर्कात आहेत. ते देखील पुढे आलं आहे. त्याचबरोबर करूणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती देखील दुसरी, तिसरी कोणी नसून ती बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील व्यक्ती होती. त्याचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र, ते बाहेर मी सांगणार आहे. मी एसपींना सांगेन. पोलिस दलामध्ये असे काही लोक असतील तर चार ते पाच लोकांवर काही आक्षेप नाही. मात्र, खालचे काही पोलिस आणि अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आक्षेप आहे, त्यांच्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं आहे, ते बोलले त्याबाबतची सर्व माहिती काढा, मी ती सर्व माहिती घेऊन मी त्यांच्याकडे जाणार आहे, अशी माहिती देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्याआधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत धस यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Comments (0)
Add Comment