निफाड, रामभाऊ आवारे – भावी पिढीच्या सुसंस्कारासाठी महिला सक्षम असणे काळाची गरज असून भविष्यकाळाचा विचार करता स्त्री ही अबला न होता सबला झालीच पाहिजे कारण एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना समाजात दिवसेंदिवस महिलांवर होत असलेले अत्याचार मान आणि बलात्कार अपमानास्पद वागणूक या बाबींवर कुठेतरी बंधने घातली गेली पाहिजे तरच ही महिला सुरक्षित जीवन जगू शकेल. प्रत्येक स्त्रीला समाजाकडून मिळणारा मान हा तिच्यासाठी व कुटुंबासाठी अभिमानास्पदच आहे असे विचार दिग्विजय सेवाभावी संस्थेच्या सचिव तथा नारीशक्ती पुरस्कार प्राप्त महिला सौ वैशाली डुंबरे (वनसगाव) यांनी व्यक्त केले आहे.
आजची महिला सक्षम झाली पाहिजे त्यासाठी तिने आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजावर एक आगळीवेगळी छाप निर्माण करताना सामाजिक शैक्षणिक आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात घेतलेली यशस्वी भरावी उल्लेखनीय असली तरीही उच्च शिक्षित मुलींना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही ही खरी शोकांतिका आहे केंद्र व राज्य सरकारने स्त्रियांना अथवा मुलींना खंबीरपणे घरातील कुटुंबांना आधार देण्यासाठी सक्षम असती गरजेचे असली तरीही त्या कुटुंबातील व्यक्तींनी त्या महिलेला आधार देणे तितकेच महत्त्वाचे बनत चाललेले आहे एक स्त्री सुशिक्षित झाली तर संपूर्ण परिवार सुशिक्षित करण्याचा तिचा मानस असतो आणि ती उच्चशिक्षित असली तर घरातील संस्कार उच्चप्रतीची होण्यास वेळ लागत नाही.
समाजात तिला मिळणारा मान हा कुटुंबासाठी ही तितकाच अभिमानास्पद असतो परंतु समाजात तिचे असणारे स्थान तितकेच कुटुंबाच्या दृष्टीने मोलाचे असणे आवश्यक आहे. समाजात कष्ट करणारी स्त्री आपल्याच घरात जेव्हा अपमान सहन करते तेव्हा तिची डोळे पाणावल्या खेरीज राहणार नाही मग तो अपमान कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडून असो एक स्त्री म्हणून जेव्हा एखादी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तेव्हा तिला प्रोत्साहन देणे ही कुटुंबाची प्रथम कर्तव्य असते.