लसीकरणात रासेयो स्वयंसेवकाची भूमिका महत्त्वाची-आयुक्त देविदास पवार

परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः
कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे.भारत तर दाटवस्तीचा लोकसंख्या असणारा देश आहे. परभणी शहर व परिसरातील अजूनही एक लाख साठ हजार लोकांचे लसीकरण बाकी आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांनी एक एक वार्ड लसीकरणासाठी दत्तक घेतला तर संपूर्ण शहराचे लसीकरण लवकर होईल अशी कल्पना माझ्या मनात आली. राष्ट्रसेवेसाठी तत्पर असणारा रासयो स्वयंसेवक निश्चितच संपूर्ण शहराचा लसीकरणामध्ये महत्त्वाचे योगदान देणार असल्याचे प्रतिपादन परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी केले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. ०३ (ऑक्टोबर) रविवार रोजी आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते.यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव यांच्यासह उपायुक्त रणजित पाटील, डॉ. शिवराज बोकडे,आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, डॉ. रोहिदास नितोंडे तसेच प्रा.प्रल्हाद भोपे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी लसीकरणाच्या कामासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन महाविद्यालयाची लसीकरणाबाबतची भूमिका विशद केली. रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.सुरेश भालेराव यांनीही या लसीकरणाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. दिगंबर रोडे, प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रा. सविता कोकाटे, डॉ.मोतीराम कदम, डॉ. हनुमंत शेवाळे, डॉ.शेख नसीमा, डॉ. पिसे, प्रा. अभिजीत भंडारे, माडे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रल्हाद भोपे तर आभार डॉ. तुकाराम फिसफिस यांनी केले.

 

Comments (0)
Add Comment