शिक्षक संघाने केला खासदार संजय जाधव यांचा सत्कार

परभणी,दि 10 ः
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या मतदानाचा अधिकार राष्ट्र निर्माण करणाऱ्या शिक्षकांनी माझ्या पारड्यात टाकला आणि सर्वांप्रमाणेच शिक्षकांच्याही अमूल्य मताने मी विजय झालो. त्यामुळे काहीपण… कधीपण… तुमच्यासाठी माझी समर्पित भावना आहे, असे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा परभणी आणि जिल्हाभरातील सर्व तालुका शाखेच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था सभागृह मध्ये ता.(१०) सोमवार रोजी परभणी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. जाधव बोलत होते. यावेळी विचार मंचावर परभणी जिल्हाध्यक्ष किशन इदगे, नेते मधुकर कदम, पद्माकर जाधव, विलास कदम, अरुण चव्हाळ, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पवार, प्रभाकर मोरे, डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघाच्यावतीने एकमेव भाषण अरुण चव्हाळ यांचे झाले. यावेळी ते म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय केंद्रीय विद्यालय, रस्ते, बांधकाम निधी आणि अनेक विकास कामांसाठी खासदार संजय जाधव यांचे कार्य सर्वश्रुत आहे. यापुढेही विकासात्मक दृष्टीने ते कार्य करत राहणार आहेत. शिक्षकांच्या संदर्भाने समायोजन, बढती, बदली प्रकरणे आदींचा निपटारा करण्याच्या संदर्भात त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
यावर खासदार जाधव यांनी,”आपण स्वतः परभणी लोकसभा मतदारसंघाचे देणे लागतो, सर्वांसाठी विकासात्मक कामे आणखीही जोमाने करू आणि शिक्षकांच्या सोबत यापूर्वीही आपण होतो आणि आताही अडीअडचणीला धावून येऊ. शिक्षकांसाठी काहीपण… कधीपण… अशी आपली अशी आपली समर्पित भावना आहे.”या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राऊलवार यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. दिलीप शृंगार पुतळे यांनी मानले. या कार्यक्रमास नामदेवराव देशमुख, पुरुषोत्तम पत्तेवार, शेख कलीम, गोकर्ण काळे, सचिन कावळे, प्रमोद अंभोरे, विष्णू गव्हाणे, दाभाडे, वसंत पापटवार, दीपक क्षीरसागर, नारायण टेकाळे आदी शिक्षक पदाधिकारी आणि जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment