सपाचे अबू आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अबू आझमी काय म्हणाले?
पराभवानंतर शिवसेनेने पुन्हा आपली विचारधारा बदलली. उद्धव ठाकरे म्हणाले की माझा हिंदुत्वाचा मुद्दा कायम राहील. सर्व धर्मांना सोबत घेऊन चालू, असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करण्यास सांगितलं, यावरुन अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले अबू आझमी?
कोण विरोधक? त्यांनी आमच्याशी निवडणुकीच्या दरम्यान संपर्क साधला नाही. तिकिट वाटपात आमच्याशी बोलणी केली नाही. मग आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काय? असा प्रश्न अबू आझमी यांनी विचारला आहे. ईव्हीएमबाबत जर लोकांना संशय असेल तर ते हटवलं गेलं पाहिजे. त्यासाठी जनतेच्या मागणीनुसार सगळ्यांना एकत्र येऊन याचा विरोध किंवा निषेध करायला हवा. उद्धव ठाकरे तर म्हणत होते की मी सेक्युलर झालो आहे. समाजवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी आठवल्या का? असा खोचक प्रश्न अबू आझमींनी विचारला आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी चालणार नाही असं झालं तर. असंही अबू आझमीम्हणाले.