कंधार, उमर शेख – कंधार तालुक्यातील फुलवळ येथील जुने गावठाण येथील जुणी शाळा श्री बसवेश्वर विद्यालय परिसरात मंगल कार्यालयाच्या कामासाठी खूप दिवसापासून प्रश्न प्रलंबित होता. याची सुरुवात सार्वजनिक गणेश मंडळ फुलवळ यांच्या माध्यमातून व फुलवळ मधील मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाच्या सहभागातून सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे तरूणा मध्ये सार्वजनिक कामासाठी उत्साह निर्माण होईल . या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीबांना मुला मुलींचे विवाहाचा खर्च वाचेल व सार्वजनिक कामासाठी या मंगल कार्याचा उपयोग होऊ शकतो. व गावातील मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे.