परभणी,दिनांक 17 – आतापर्यंत जाती धर्मावर आधारित मतदान केले परंतु आता परिवर्तनाची लाट आहे आणि हे परिवर्तन करण्यासाठी मतदार सज्ज आहेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन करा असे आवाहन परभणी विधान सभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केले.
विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे यांनी परभणी तालुक्यातील झरी येथे भेट दिली असता त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी झरी गावातून विजयी संकल्प रॅली काढण्यात आली.यावेळी बोलताना भरोसे म्हणाले,ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन करणे गरजेचे आहे, आपण बाहेर जिल्ह्यातील उमेदवाराला निवडून दिले परंतु दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा बदल मतदार संघात दिसून आला नाही,त्यामुळे परिवर्तनासाठी मतदारांनी सज्ज राहावे परिवर्तन ही काळाची गरज आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व राज्याला लाभले आहे, त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी परभणी विधानसभेत धनुष्यबान विजय झाला पाहिजे असे सांगितले.
दरम्यान त्यांनी परभणी शहरातील भीम नगर येथे देखील भेट दिली. यावेळी त्यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आनंद भरोसे यांचे स्वागत केले.
व्यापारी बांधवांशी साधला संवाद
परभणी शहरातील नवा मोंढा भागात आनंद भरोसे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात येथील व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी निश्चितपणे सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. मोंढ्यात येणारे व्यापारी, शेतकरी यांच्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण होण्यात यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले. यावेळी मोठ्यात ठिकठिकाणी व्यापारी बांधवांनी भरोसे यांची स्वागत केले. निवडणुकीत आम्ही सर्वजण शिवसेनेसोबत असल्याची ग्वाही यावेळी व्यापारी बांधवांनी दिली.