मुलींना मोफत शिक्षण द्यावे,लक्षवेधी विधानसभा अधिवेशनात मांडणार-आ.डॉ.राहुल पाटील

परभणी,दि 20 ः
राज्यात मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा सरकारने केली होती,परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप केली नाही, शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मुली आत्महत्या करत आहेत, त्यामुळे सरकारला जाग कधी येणार असा सवाल करत मुलींना मोफत शिक्षण द्यावे या मागणीची लक्षवेधी विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
राज्यात मुलींना शिक्षण मोफत देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे, सरकारने याबाबत घोषणा केली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. दोन दिवसापूर्वी पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील योगिता खंदारे या बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीने आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आत्महत्या केली. या आदी देखील जिंतूर तालुक्यात पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांना खर्च झेपावत नसल्याने मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बेटी बचाव बेटी पढाव असा नारा दिला जातो परंतु त्याच मुलींसाठी शिक्षणात कुठलीही तरतूद केली जात नाही. मुली शिकाव्यात यासाठी शासनाने त्यांना पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत मोफत सुविधा द्यायला पाहिजेत,सरकार अन्य योजनांवर अब्जावधी रुपये खर्च करते.परंतु मुलींच्या शिक्षणासाठी का नाही ? असा खडा सवाल आमदार डॉ.पाटील यांनी केला आहे.मुलींनी आत्महत्या करु नये असे आवाहन त्यांनी केले पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत आपण आवाज उठवणार अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

Comments (0)
Add Comment