पूर्णा / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य अॅथेलेटीक्स असो यांच्या मान्यतेने पूर्णा तालुका अॅथेलेटीक्सच्या वतीने गुरुवारी ता.१३ फेब्रुवारी रोजी पूर्णा येथील संत तुकाराम महाराज मंदिर समोरील मैदानावर मैदानी स्पर्धेची निवड चाचणी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार जगदिश जोगदंड यांच्या हस्ते पार पडले यावेळी, सुशील देशमुख, रणजित काकडे, सज्जन जैस्वाल, प्रकाश बनाटे,गजानन हिवरे,सुशिल गायकवाड,शेख असद,धरमसिंग बायस, सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या निवड चाचणीत ४०० खेळाडू सहभागी झाले होते.
पूर्णा येथिल क्रिडा प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र अॅथलेटीक्स असोशिएशन च्या मान्यतेने परभणी जिल्हा सब ज्युनिअर निवड चाचणी स्पर्धा पूर्णा शहरात आयोजित करण्यात आली होती.यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेच्या निवड चाचणीत ८ ते १४ वर्षांखालील वयोगटातील ४०० ते ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.यावेळी ५० मी, ६० मी,८० मी,१०० मी,३०० मी, धावणे,लांब उडी (स्टॅडींग जम्प),गोळाफेक आदीं क्रीडा प्रकार घेण्यात आले.स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पंढरपूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेस पात्र ठरले असल्याची माहिती सज्जन जैस्वाल यांनी दिली.स्पर्धेचे पंच म्हणून शेख अन्सार ,कैलास टेहरे,यमनाजी भालशंकर, अमोल नंद,काजळे, यांनी काम पाहिले.तर सोनु बहोत,उद्धव बोबडे,संग्राम ठाकूर,सचिन पांचाळ,माही कराळे ,जानवी भाले, वैशाली धुत, दिव्या स्वामी आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सिद्धी हिवरे हिचे यश..
विद्याप्रसारणी शाळेची इयत्ता ३ मधील खेळाडू सिद्धी गजानन हिवरे हिने १० वर्ष वयोगटाखालील’लांब उडी’ प्रकारात द्वितीय स्थान पटकावत सिल्वर पदकाची मानकरी ठरली असून, तीची पंढरपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी गौरव करताना शिवसेना मा.जिल्हा प्रमुख सुधाकर खराटे, जेष्ठ क्रिडा प्रशिक्षक रणजित काकडे सर,सुशिलराव देशमुख सर, सज्जन जैस्वाल सर, प्रकाश रवंदळे सर ,आनंद ढोणे,सोनु मास्टर व गजानन हिवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.