सेलूतील मोंढा परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची व्यापारी असोसिएशनची मागणी

सेलू,दि 24 ः
पोलिस निरीक्षक सेलू यांना व्यापारी असोसिएशन सेलू च्या वतीने निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मोंढा व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत चालले आहे. कांही दिवसांपूर्वीच भरदिवसा सकाळी साडेआठ च्या सुमारास घराची कडी वाजवून तसेच चाकूचा धाक दाखऊन एका सुवर्णकार कारागिरास लुटण्यात आले आहे . तसेच परवाच मोंढा परिसरातच एक जिवंत काडतुस सापडल्याची घटना देखील घडली आहे .
यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत तरी पोलीस स्टेशन सेलूच्या वतीने मोंढ्यामध्ये गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी असोशिएशन च्या वतीने एका निवेदनाद्वारे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर कावले यांच्याकडे करण्यात आली आहे .
यावेळी ओमभाऊ तोष्णीवाल,मनोजदादा बिनायके, राजकुमार गंगवाल, जयसिंग शेळके आदींची उपस्थिती होती .

Comments (0)
Add Comment