परभणी, प्रतिनिधी – परभणी शहरात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली औद्योगिक वसाहत ही निवासी वसाहत झाली असून परभणी जिल्ह्यातील नव्या उद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याकरिता बाभळगाव येथे नव्या एमआयडीसी ची स्थापना करण्यात येत असल्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितले.
कॉटन बेल्ट म्हणून परभणी जिल्ह्याची ओळख अवघ्या महाराष्ट्राला असून कृषीपूरक उद्योग उभारणीच्या कामी परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले .परभणी तालुक्यातील बाभुळगाव येथे नवीन एमआयडीसीस मंजुरी करून घेतल्याबद्दल परभणी येथील व्यापारी आणि शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा शनीवार दि. 25 रोजी शिवाजीनगर येथे सत्कार करण्यात आला आला ,त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार ,अरविंदकाका देशमुख ,शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार ,अनुसूचित जाती जमाती आघाडीचे शहर प्रमुख अमोल गायकवाड , शिवउद्योग सहकार सेनेचे समन्वयक अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले की परभणी जिल्ह्यातील सुपीक जमीन कापूस सोयाबीन, हळद आणि इतर नगदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे गोदावरी ,पूर्णा दुधना , नदीवर अनेक बंधाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळे जिल्ह्यात यापुढे पाण्याची कमतरता राहणार नाही .त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नव उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी कृषी पूरक उद्योग धंदा वाढीसाठी पुढाकार घ्यावा. नव उद्योजकाना मुख्यमंत्री रोजगार योजना ,पंतप्रधान रोजगार योजना आदी माध्यमातून बँकेमार्फत वित्त पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगातून तयार होणाऱ्या मालास परदेशातून चांगली मागणी मिळत आहे. त्यामुळे परभणीच्या एमआयडीसीत उत्पादित होणाऱ्या मालास निर्यात करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यानी सांगितले . यावेळी मोंढा आडत व्यापारी महासंघाचे गोविंद अजमेरा, मोतीसेठ जैन, कैलास शिंदे, संतोष दाभाडे, दिलीप इंदानी ,दीलीप मुरकुटे, आनंद खापरे ,दत्ता मुखरे ,रामजी भराड, बालाप्रसाद इंदानी, वैभव राऊत ,गोविंदराव काळे, बाळासाहेब ढोले आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.