विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे यांना जाहीर

 

परभणी – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे यांना जाहीर झाला आहे. सुदरील पुरस्कार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता देण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण ३० जानेवारी रोजी स. ११:०० वा. महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे असणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

डॉ.नितोंडे मागील अनेक वर्षापासून श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्षही आहेत. मागील एक वर्षापासून ते महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत. उपक्रमशील,विद्यार्थीप्रिय, संशोधकवृत्ती असलेले डॉ. नितोंडे यांनी संशोधन क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेत विद्यापीठाने सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.

त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशराव सोळुंके, सरचिटणीस आ.सतीशराव चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.विजया नांदापूरकर, प्रबंधक विजय मोरे आदींनी अभिनंदन केले.

Comments (0)
Add Comment