खडक माळेगाव आरोग्य केंद्रांतर्गत वनसगावला ४२२ नागरिकांचे लसीकरण

शासनाचे नियम पाळत शांततेत लसीकरण पूर्ण

 

 

निफाड, रामभाऊ आवारे – covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आपल्या गावातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे या उद्देशाने वनसगाव तालुका निफाड येथे खडक माळेगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसगाव येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कलीम पठाण (उगाव), आरोग्य सेविका प्रतिभा खैरनार, आरोग्य सेवक गोरक्षनाथ ताजणे, मुस्तफा तांबोळी (उगाव),आशा गटप्रवर्तक सविता पवार यांच्या सूत्रबद्ध नियोजनात वनसगाव सरपंच महेश केदारे, उपसरपंच राहुल डुंबरे, मा उपसरपंच सरला शिंदे, ग्रा पं सदस्य छोटुकाका शिंदे, कल्पना कापडी, उत्तम शिंदे, संतोष शिंदे, एकनाथ शिंदे, पत्रकार रामभाऊ आवारे सर ,ग्रामसेवक विजय गोल्हार, समाधान शिंदे यांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमांचे पालन करत मास्क व सनी टायझर चा वापर करून खडक माळेगाव आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या वनसगावला ४२२ पुरुष व महिलांनी कोवीशिल्ड लसीकरणाचा लाभ घेतला असल्याची माहिती खडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी वनसगाव उपकेंद्रांतर्गत जि प शिक्षक समाधान पवार, अंगणवाडी सेविका कांताबाई शिंदे,मंगल शिंदे,
नंदा घाडगे,मीना कुलकर्णी, आशा सेविका प्रांजल निरभवणे ,रत्ना शिंगाडे ,मंगला गाडे, प्रमिला शिंदे तसेच ग्रामपंचायत प्रशासन, तरुण मित्र मंडळ आदींचे विशेष सहकार्य लाभले.

असे झाले लसीकरण—
पहीला डोस–
१८ ते ४४ वयोगटातील ११८ पुरुष व १३३ महीला.
४५ ते ६० वयोगटातील ५३ पुरुष व ५४ महीला.
६० वयोगटातील पुढील ०८ पुरुष व ०२ महीला.
एकुण ३६८ नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ.

दुसरा डोस-
१८ ते ४४ वयोगटातील २० पुरुष व १८ महिला.
४५ ते ६० वयोगटातील ०४ पुरुष व ०४ महिला.
६० वयोगटातील ०४ पुरुष व ०४ महिला.
एकुण ५४ नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ.

आरोग्य विभाग पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानले आभार–
खडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण शिंदे व आरोग्य केंद्रांतर्गत असणारे सर्व कर्तव्यदक्ष पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे सातत्याने लसीकरणासाठी सहकार्य लाभत असून अतिशय शांततेने व सुनियोजित पद्धतीने लसीकरणासाठी वनसगावसाठी ते सहकार्य करत असतात. या सहकार्याबद्दल वनसगाव ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेश केदारे यांनी त्यांचे आभार मानून असेच सहकार्य यापुढेही असू द्या अशी विनंती केली.

corona vaccinationkhadak malegaonvaccinationvanasgav
Comments (0)
Add Comment