‘छावा’ च्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त पांगरी (जि.नाशिक) येथे 1 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम

बडोदा संस्थानचे महाराजा सत्यजित गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी,दि 31 (प्रतिनिधी)ः
छावा मराठा संघटनेचा 28 वा वर्धापन दिन 1 जानेवारी 2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून पांगरी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराजा सत्यजित गायकवाड, बडोदा संस्थान यांच्या हस्ते होणार असुन छावा मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे व यावेळी आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक तथा प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी केले आहे.

छावा मराठा संघटनेचा 28 वा वर्धापन दिन 1 जानेवारी 2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पांगरी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11.00 वा. या सोहळ्याचे उद्घाटन महाराजा सत्यजित गायकवाड, बडोदा संस्थान यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कृषि मंत्री दादासाहेब भुसे, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित वर्धापन दिनानिमित्त संघटनेने 28 वर्षापासून केलेल्या कार्याचा आढावा व पुढील कार्याचे नियोजन जाहीर करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या परिवाराला दहा लाख रुपये दिले आहेत. तर काही जणांना नोकरी दिलेली आहे तसेच शिक्षण विभागातील 133 जणांना नोकरीत सामावून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्ना बाबत या अधिवेशनात सरकारसोबत प्रत्यक्ष चर्चा करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असुन सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंधांचे पालन करून सर्व पदाधिकाराऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, प्रदेश सरचिटणीस योगेश केवारे, प्रदेश कार्याध्यक्ष इजि. तानाजी हुस्सेकर, परमेश्वर नलावडे यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल पांगारकर, छावा मराठी माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी अॅड. मयूर पांगारकर, जगदीश पांगारकर आदीसह पांगरी ग्रामस्थ व छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत असुन परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष माधव आवरगंड, पुर्णा तालुका अध्यक्ष निवृत्ती नवघरे, सचिन आवरगंड यांनी केले आहे.

वर्धापन दिना निम्तित विविध कार्यक्रम
 कोरोना लसीकरण शिबिर
 सर्वरोग निदान शिबीर
 रक्तदान शिबिर, स्थळ:- श्री संत हरिबाबा मंदीर परिसर, पांगरी
 सामाजिक व राजकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्यकेलेल्या मान्यवरांचा सत्कार
 छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगारकर यांच्या वाढदिवासा निमित्त अभिष्टचितंन सोहळा
वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment