परभणी / प्रतिनिधी – येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्यावतीने वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बबन पवार म्हणाले की शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या चार बालकांची मुगलाकडून हत्या करण्यात आली.
गुरुगोविंद सिंग यांच्या प्रमाणेच त्यांचे चारही पुत्र धर्म व राष्ट्र भक्तीने भारावलेले होते, बाबा अजितसिंह, बाबा जुझार सिंह यांच्या बलिदानानंतर 26 डिसेंबर रोजी वयाच्या 9 व्या वर्षी बाबा फतेह सिंह तर बाबा जोरावर सिंह वयाच्या 7 व्या वर्षी शहीद झाले, हे वीरमरण स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. यावेळी विचारपिठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबन पवार, उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, डॉ. उज्वला जगताप, डॉ.अविनाश पांचाळ यांच्या हस्ते वीर बालकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अविनाश पांचाळ यांनी केले तर आभार प्रा. डॉ. उज्वला जगताप यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सच्चिदानंद खडके, डॉ. एन. व्ही. सिंगपुरे, राजाराम मुत्रटकर, तनुजा रासवे यांनी प्रयत्न केले. डॉ.नितिन बावळे, डॉ.कांबळे, डॉ. शेवाळे एच.डी., डॉ….डॉ.श्रीधर पांढरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.