कार्यकर्त्याला खांद्यावर घेऊन नेत्याचा विजयी जल्लोष

 

सेलू ( नारायण पाटील ) – आतापर्यंत आपण निवडणुकीत विजयानंतर कार्यकर्ते हे नेत्याला आपल्या खांद्यावर घेवून विजयी जल्लोष साजरा करताना बरेचदा पाहिलेले आहे. पण नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बाजार समिती निवडणुकीत आपला एक गरीब कार्यकर्ता हमाल मापारी मतदारसंघातून विजयी झाल्याने माजी जि.प. सभापती अशोक काकडे यांनी त्याला आपल्या खांद्यावर घेवून जल्लोष साजरा केल्याचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

 

 

कोणत्याही राजकारणाचा अविभाज्य घटक हा कार्यकर्ता असून नेता कार्यकर्त्याशिवाय अपूर्ण राहत असतो. कार्यकर्त्यांला सतत आश्वासने देत त्याचे काम न करण्याची हातोटी फक्त नेत्यालाच जमते. परंतु आपले राजकीय भवितव्य हा सर्व सामान्य कार्यकर्ता असून त्याचा विजय देखील तेवढाच महत्वाचा आहे .

 

कुठल्याही कार्यक्रमांसह निवडणूकीत

कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात. निवडून आल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्याची पध्दत नेहमीच नेत्याला खांद्यावर घेण्याचीच असते. यातच ट्रॅक्टरमधून गुलाल उधळणे, गाण्याच्या रील तयार करणे, एका विशिष्ट ठेक्यावर नाचणे असे प्रकार दिसतात. पण नुकताच एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून तो लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत तालुक्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले .यावेळी कार्यकत्यांनी मोठा जल्लोषात मिरवणुका काढत आपापल्या भागातील नेत्यांना खांद्यावर घेत कार्यकर्ते नाचले. पण यात एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि राजकारणातील सुखद चित्र समोर आले. माजी जि.प.सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते अशोक काकडे यांनी नजीकचे कार्यकर्ते अनिल बरडे यांनी हमाल मापाडी मतदारसंघातून विजय मिळवल्याने त्यांनी आनंदात त्याला खांद्यावर घेऊन नाच केला. याबाबत अनिल बरडे यांनी अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली. माझी जेमतेम आर्थिक स्थिती आहे. कधीच कुठलीही निवडणूक लढविली नसून सामान्य परिस्थितीत हा विजय मिळाला याचा आनंद झाला. पण नेते अशोक काकडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला उचलून कौतुक केले हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता .

Ashok kalade newsSelu parbhani news
Comments (0)
Add Comment