इंदेवाडी येथे विलास बाबर यांच्या उपस्थित भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा

परभणी,दि 06 (प्रतिनिधी)ः
भाजप च्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवार (दि.06)  इंदेवाडी ता परभणी येथे कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच  बालासाहेब कच्छवे तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष  विलास बाबर यांची उपस्थिती होती. सर्व प्रथम पक्षाचा ध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात केली,बुथ प्रमुख ते तालुका, जिल्हा पदाधिकारी यांच्या घरांवर ध्वज फडकवून नावाच्या पाट्या घरांवर प्रथम दर्शनी भागात लावण्यात आल्या, त्या भागातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा दैनिकात आलेल्या लेखाचे वाचन करुन त्यावर मंथन केले.प्रधानमंञी आदरनिय नरेंद्रजी मोदी, अध्यक्ष जे पी लडडा यांचे विचार रेडिओ व्दारे सामुदायिक ऐकले.
या वेळी विलास बाबर यांनी आपण सर्व कार्यकर्ते तन मन धनाने काम करुन जिल्ह्यात पार्टी मजबूत करण्याचा संकल्प आज स्थापना दिनी करुया ही शपथ घेऊन राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश तवर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी बिराजदार,केशव कच्छवे, सुरेश कच्छवे, भास्कर कच्छवे, नवनाथ वाघ, ज्ञानोबा वाघ,बालूगुरूजी कच्छवे, गोविंद कच्छवे,आदीनी परिश्रम केले

Comments (0)
Add Comment