विश्वकर्मा योजना वेबसाईट बंदमुळे लाभार्थी जेरीस

निफाड नाशिक प्रतिनिधी / रामभाऊ आवारे – केंद्र शासनाच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ गाजावाजा करून बरेच दिवस झाले आहे. मात्र योजनेची वेबसाईटच बंद असल्याने विश्वकर्मा बांधव नोंदणीसाठी सेतू व ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारून जेरीस आले आहे. पारंपारिक व्यवसायातील कौशल्याला वाव देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने २६ जानेवारी रोजी पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केल्यानुसार ग्रामीण बरोबरच शहरी भागातील विश्वकर्मा बांधव कामधंदा सोडून कागदपत्र घेऊन सेतू व ग्रामपंचायत कार्यालयात जात आहेत. मात्र तासंतास तीष्टत उभे राहून देखील विश्वकर्मा योजनेची वेबसाईट ओपनच होत नाही. आणि झाली तरी लाभार्थी चा आधार नंबर लिंक नाही असा चुकीचा मेसेज संगणक दाखवत आहे. तसेच दोन-तीन वेळेस ओटीपी द्यावा लागूनही सदर योजनेत नाव समाविष्ट होत नसल्याने, आहे त्या रोजंदारीचा काम धंदा सोडून तीन चार दिवस हेलपाटे मारून देखील नाव नोंदले जात नसल्याने खेरवाडी पंचक्रोशीतील विश्वकर्मा बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तरी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी विश्वकर्मा योजना वेबसाईट तात्काळ सुरळीत करून लाभार्थ्यांचे कार्यालयीन हेलपाटे व वेळ वाचवावा असे संताप जनक आवाहन विश्वकर्मा संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आहेर व तालुक्यातील विश्वकर्मा बांधवांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment