सोनपेठ तालुक्यात सहा गावात होणार सुसज्ज बुध्द विहार-आमदार राजेश विटेकरांनी आणला कोट्यवधींचा निधी

परभणी,दि 14 ः
बोधीसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे बुध्द विहार आणि असेच भव्य आणि सुसज्ज अशा बुध्द विहार सोनपेठ तालुक्यातील सहा गावांमध्ये होणार आहे. यासाठी  आमदार राजेश विटेकर यांनी विशेष महत्त्व देत यासाठी खास प्रयत्न करत कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला आहे.
आमदारकिच्या पहिल्याच दोन महिन्यांत आमदार राजेश विटेकर यांनी सामाजिक भान राखत अशा पध्दतीने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.देशाच्या सर्वांगीण जडणघडणीत महामानवांचे योगदान अतुलनीय आहे.
महामानवांच्या वैचारिक प्रगल्भतेचा समाजमनावर मोठा पगडा असतो अन् हीच प्रेरणा घेऊन महामानवांना अभिप्रेत असणारा समाज अन् देश उभा केला पाहिजे याच हेतुने आमदार राजेश विटेकर यांनी तालुक्यातील गावागावांत भव्य आणि सर्वसोयींनी सुसज्ज असे बुध्द विहार बांधण्याचा सामाजिक मानस ठेवत सर्वांगीण विकासाचा विडा उचलला असल्याची माहिती आमदार विटेकर यांनी दिली.

या गावांत होणार आहेत भव्य बुध्द विहार

शेळगाव – पन्नास लक्ष
उखळी (बु.) – पन्नास लक्ष
वानिसंगम – पन्नास लक्ष
कान्हेगाव – पंचवीस लक्ष
लासिना – पंचवीस लक्ष
एकुण दोन कोटी रुपये

गावांच्या वैभवात भर घालणारेच बुध्द विहार असणार – आ.विटेकर

सदरील बुध्द विहार बणवतांना ते सुसज्ज व भव्य कसे होईल यासाठी कसलीही कसर सोडली जाणार नसल्याचे सांगत आमदार विटेकर यांनी हे बुध्द विहार गावांच्या वैभवात भर घालणारेच असेल असेही सांगितले शिवाय या बुध्द विहारामध्ये सुंदर अशी पंचधातूची भगवान बुध्द यांची मुर्ती व अर्धाकृती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा आपला मानस असल्याचे आमदार विटेकर यांनी सांगितले

Comments (0)
Add Comment