मुंबई – तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचे (asaran bapu) धार्मिक साम्राज्य दहा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे.
अनेक मुलींवर बलात्कार (rape on girls) करणारा अध्यात्मिक बाबा आसाराम बापूला (spiritual baba asaram bapu) आज दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून आसाराम आणि त्याचा मुलगा नारायणसाई तुरुंगात खितपत पडले आहेत. असे असले तरी या दोघांचा इन्कम मात्र हजारो कोटींत सुरुच आहे. आसाराम बापुचा हा हजारो कोटींचा डोलारा कोण सांभाळतोय?
सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बेरानी गावात एप्रिल 1941 मध्ये एका मुलाचा जन्म झाला. नाव होते आसुमल हरपलानी. 1947 मध्ये फाळणीनंतर हे कुटुंब भारतात आले आणि अहमदाबाद शहरात स्थायिक झाले. सिंधी कुटुंबातील आसुमल हरपलानी यांनी साठच्या दशकात लीलाशाह यांना आपले आध्यात्मिक गुरू केले. लीलाशाह खुश झाले आणि त्यांनी त्या मुलाचे नाव आसाराम ठेवले. ज्या आसारामने श्रद्धेचे नवे साम्राज्य निर्माण केले.
आपल्या प्रवचनाने त्यांनी देशात समर्थकांची गर्दी निर्माण केली. ब-याच वर्षांनी त्याच्या काळ्याकुट्ट कृत्यांचे रहस्य उलगडू लागले. बलात्कार, खून, गुन्हेगारी कट आणि इतर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले.
आसाराम किंवा तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीएत. तर ही जबाबदारी आता आसाराम बापूंची कन्या भारतश्री पार पाडत आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था आहे. तिचे मुख्यालय अहमदाबादला आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करत आहे.
भारतीश्रीचे देखील आयुष्य वादग्रस्तच राहिले आहे. ती देशभर प्रवास करत असते. ३० राज्यांमध्ये आश्रमांचे साम्राज्य पसरलेले आहे. परंतू ती आसारामसारख्या तिथे जाऊन प्रवचने करत नाही. यामुळे ती मीडियाच्या प्रसिद्धीपासून दुर आहे.
2013 मध्ये आसारामला अटक झाली तेव्हा भारती आणि आसारामची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती पण नंतर त्यांची सुटका झाली. 8 वर्षांत भारतीने आसारामच्या सर्वच मालमत्तांवर चांगली पकड मिळविली आहे. तीच या आश्रमांचे खर्च, उत्पन्न पाहते.
भक्तांची संख्या आणि देणगी कमी झाली असली तरी आश्रमातील लोकांचे येणेजाणे काही थांबलेले नाहीय. या लोकांना आसारामला गोवण्यात आल्याचे आजही वाटत आहे. आसारामच्या अटकेनंतर वर्षभरातच भारतीने त्याच्या ट्रस्टचा ताबा घेतला होता.
भाग्यश्री महागड्या कार वापरते. अहमदाबादमधील बाबा आसाराम यांच्या आश्रमाच्या आवारात प्रवचन आणि आरतीला ती उपस्थित राहते. ४८ वर्षीय भारती नाटकीय पद्धतीने प्रवचन देते. नाचते, गाते. तिचे वडील जसे करायचे तसे ती स्वतःला फुलांनी सजवते. आश्रमातील आरती संबंधित उपक्रम दररोज यूट्यूबवर अपलोड केले जातात.