मुंबई : देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवा लाँच करण्यात आली आहे. आता कर्मशियल बेसवर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ १३ शहरातील लोकांना होणार आहे. हळूहळू सगळ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होऊ शकते.
१३ शहरांपासून सुरुवात!
5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतातील 5G इंटरनेटच्या उद्घाटन सोहळ्यात इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये संबोधित केलं. यादरम्यान, सर्वांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ‘भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून आम्ही जे काही केले त्याचा मला खूप अभिमान आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस आता एशियन मोबाईल कॉंग्रेस, ग्लोबल मोबाईल काँग्रेस बनली पाहिजे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत 5G इंटरनेट प्रत्येक शहर, गाव आणि गावात पोहोचेल असा विश्वास त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. याचा फायदा आरोग्य, शिक्षण क्षेत्रात मोठा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.