लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच २१०० रुपये जमा होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये होणार आहे. मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील हफ्त्याचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हफ्त्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते. आता डिसेंबर महिन्यातील हफ्त्याचे पैसे कधी जमा करायचे याबाबतचा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी आर्जदारांचा आकडा २ कोटी ४७ लाखांपर्यंत आहे.
लाडकी बहीण योजनेला राज्याभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ५ महिन्यांचे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ७५०० रुपये जमा झाले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.
At BWER Company, we prioritize quality and precision, delivering high-performance weighbridge systems to meet the diverse needs of Iraq’s industries.