किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते? कर्ज किती मिळणार ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. शेतकरी आता 1 एप्रिल 2025 पासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करु शकतील. याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात मिळते कर्ज

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये शेतीसाठी देखील अनेक नवीन घोषणा केल्या आहेत. यातीलच एक घोषणा म्हणजे किसान क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते. जेणेकरुन त्यांच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण होतात. त्याच वेळी, कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास, सरकार व्याजावर 3 टक्के सूट देते, ज्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो.

किसान क्रेडिट कार्डची रक्कम शेतीसाठी दिली जाते

KCC शी लिंक केलेल्या RuPay कार्डद्वारे, शेतकरी ATM मधून पैसे काढू शकतात आणि डिजिटल पेमेंट देखील करु शकतात. याशिवाय KCC धारक शेतकऱ्यांची पिके प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत समाविष्ट केली जाऊ शकतात. केसीसी रक्कम शेतीसाठी दिली जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि डीएपी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करू शकतात.

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा कराल अर्ज?

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करू शकता. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कोणत्याही बँक, लघु वित्त बँक आणि सहकारी मध्ये केला जाऊ शकतो.

किसान क्रेडिट  कार्डचे फायदे काय? 

किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. आता 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. म्हणजे जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला 3 टक्के अनुदान मिळते.

किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते? 

किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना अर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते. मात्र योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा नाही. आता सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज पाच वर्षांपर्यंत घेता येते. किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील पाच वर्षांपर्यंत आहे.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल असणे आवश्यक आहे. याशिवाय, जमिनीच्या मालकीचा/भाडेकराराचा पुरावा हा शेतकऱ्याच्या नावावरील जमीन अभिलेख असावा (खतौनी, जमाबंदी, पट्टा इ.), शेतकरी भाडेकरु असल्यास भाडेकराराची वैध कागदपत्रे असावीत. हे सुरक्षित कर्ज असल्याने, शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमेइतकेच तारण आवश्यक आहे.

Comments (0)
Add Comment