लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.
आपल्याकडे मजबूत व्यवस्था
घरात लागलेलं वळण फार महत्त्वाचं असत कारण ते परंपरेने चालत आलेला असत. पाश्चात संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे त्यांच्या कडे सुद्धा संस्कृती होती. पण त्यांनी आता त्याचा विसर पडला आहे. मात्र आपल्याकडे संस्कृती अजून जपली जात आहे. घरातील लहान लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबा पासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.
या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर 2.1 पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 2000 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये, असा उल्लेख करत भागवत म्हणाले की आता पॉईंट एक तर माणूस जमत नाही. मग जर 2.1 एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग तीन पाहिजे कमीत कमी असंही भागवत म्हणाले.