‘बघून येतो’ असे सांगून थेट शपथ का घेतली? शरद पवारांच्या टीकेला दिले भुजबळांनी उत्तर

मुंबई – अजित पवारांबरोबर शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यासारखे नेतेही बंडात सहभागी झाले आहेत. शरद पवारांनी यासंदर्भात बोलताना बुधवारच्या मुंबईत बैठकीमध्ये ‘काय चाललंय बघून येतो म्हणत भुजबळ गेले आणि शपथविधीला पोहोचले’ असं म्हणत टीका केली. शरद पवारांनी यापूर्वीही बंडानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांबरोबरचा हा संवाद सांगितला होता. आता याच संवादासंदर्भात भुजबळ यांनी खुलासा केला आहे.

 

 

छगन भुजबळ म्हणाले, (chhagan bhujbal said) हे खरे आहे की त्यादिवशी मी शरद पवारांना ‘बघून येतो’ असे म्हणालो होतो. पण, हे सर्व काही एका दिवसात घडलेले नाही. आपण सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी आमच्या महिना, दोन महिना बैठका झाल्या होत्या. याबाबत शरद पवारांशीही चर्चा झाली होती. मात्र, निर्णय होत नव्हता. अखेर रविवारी याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी अजित पवारांचे निवासस्थान देवगिरी येथे बैठक झाली तेव्हा सुप्रिया सुळेदेखील तेथे हजर होत्या. शेवटपर्यंत काही मार्ग निघतो का यासाठीच मी प्रयत्न करत होतो.

 

छगन भुजबळ म्हणाले, सरकारमध्ये सामील होण्याआधी आम्ही सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. हे सह्यांचे पत्र आम्ही निवडणूक आयोगाकडेही दाखल केले आहे. पक्षाची घटना, नियम यांना अनुसरुनच आम्ही पावले टाकली आहेत. आम्ही काहीही चुकीचे केले नाही.

 

 

दरम्यान, बंडानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या पोस्टर्सना काळे फासले होते. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी हे काळे पुसले होते. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे माझ्यावर प्रेम असणे स्वाभाविक आहे. मात्र, अशीच भावना संपूर्ण पक्षात असायला हवी होती. ती नसल्यानेच हे घडले.

chhagan bhujbal newschhagan bhujbal saidmaharashtra politicsncp newspolitical crisispoliticssharad pawar & chagan bhujbal
Comments (0)
Add Comment